In Pics : दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयी रथ रोखला, 5 गडी राखून दिली मात
भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात दमदार केली होती. पाकिस्तान, नेदरलँडला मात दिल्यावर आज मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी पाकिस्तानवर 4 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला नंतर नेदरलँडला 56 धावांनी मात दिली. पण आज दक्षिण आफ्रिकेनं भारताला 5 विकेट्सेनी मात दिली.
सामन्यात भारताची वरची फळी पार फेल गेल्याचं दिसून आलं.
आधी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारत केवळ 133 धावाच करु शकला.
भारताची सुरुवातच खराब झाली सलामीवीरापासून निम्मा संघ 50 धावा होण्याच्या आतच तंबूत परतला.
यावेळी सर्वात आधी रोहित शर्मा 15 धावांवर मग राहुल 9 धावांवर त्यानंतर विराट कोहली 12 रन करुन आणि मग हुडा शून्य तर हार्दिक पांड्या 2 धावा करुन तंबूत परतला.
ज्यानंतर सूर्युकमार आणि दिनेश कार्तिक यांनी भारताचा डाव सावरला. सूर्या फटकेबाजी करत होता तर दिनेश केवळ त्याला साथ देत होता. पण अखेर कार्तिक 6 रन करुन बाद झाला. ज्यानंतर आश्विन, भुवनेश्वर, शमी अशा साऱ्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला पण ते खास कामगिरी करु शकले नाही. सूर्यकुमारही 40 चेंडूत 68 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर मात्र भारत केवळ 133 धावांपर्यंत मजल मारु शकला.
ज्यानंतर 134 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात उत्तम झाली.
भारताकडून दुसरी ओव्हर टाकताना अर्शदीपने दोन महत्त्वाचे विकेट्स घेतले. 6 ओव्हरमध्ये 24 रनांवर दक्षिण आफ्रिकेचे 3 गडी बाद झाले होते.
पण त्यानंतर मार्करम आणि डेविड मिलरने दमदार भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.