South Korea Stampede : 'मृत्यू'ची हॅलोविन पार्टी! दहा मिनिटांच्या चेंगराचेंगरीत 151 जणांचा मृत्यू, 50हून अधिकजण हार्टअटॅकनं दगावले
South Korea News : दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये काल एका हॅलोविन पार्टीत मृत्यूचं तांडव घडलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री हॅलोवीन पार्टीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 151 जण ठार तर 150 हून अधिक गंभीर जखमी झालेत.
यापैकी 50 जणांचा मृत्यू ह्रदयविकाराचा झटक्यानं झाला आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता आहे.
चेंगराचेंगरीच्या कारणाबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
योनहाप वृत्तसंस्थेनुसार, सियोलमध्ये हॅलोविन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान एका छोट्या रस्त्यावरून पुढे जात असताना चेंगराचेंगरी झाली.
अग्निशमन विभागाला रात्री 10.22 वाजता या दुर्घटनेची माहिती मिळाली. पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं. तिथे 120 लोक मृतावस्थेत आढळले. तर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश व्यक्ती 20 वर्षांचे होते. मृतांचा आकडा वाढणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या मदतकार्य सुरू आहे.
द कोरिया हेराल्डच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री मेगासिटीच्या मध्यवर्ती जिल्ह्याच्या इटावॉनच्या अत्यंत अरुंद रस्त्यांवर सुमारे एक लाख लोकांचा जमाव जमल्याचा होता. यादरम्यान एका हॉटेलजवळ चेंगराचेंगरी झाली.
विशेष म्हणजे, जगातील अनेक पाश्चात्य देशांमध्ये हॅलोविन साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की, हॅलोविनच्या रात्री चंद्र त्याच्या नवीन अवतारात दिसतो.
पण हिच हॅलोविन पार्टी अनेक कुटुंबांसाठी दुःख घेऊन आली.
या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.