Israel Palestine War : इस्रायल-हमास युद्धाचा दहावा दिवस, 10 फोटोंमधून पाहा संघर्षाचं वास्तव
इस्रायल-हमास युद्धाचा आज दहावा दिवस आहे. इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसण्याच्या तयारी आहे. (Image Source : Google)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत.(Image Source : Google)
इस्रायल-हमास दोन्हींमधील संघर्ष सुरुच आहे. या युद्धात आतापर्यंत 4500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.(Image Source : Google)
इस्रायलने गाझा पट्टीतील पाणी आणि वीजपुरवठा पूर्णपणे बंद केल्याने तेथील पॅलेस्टिनी नागरिकांचे हाल होत आहेत. इस्रायल सैन्य गाझावर हल्ला करून ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.(Image Source : Google)
हमासने इस्रायली नागरिक आणि काही परदेशी नागरिकांचं अपहरण करुन त्यांना ओलिस ठेवलं आहे. याचं प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायली लष्कर गाझामध्ये घुसण्याच्या तयारीत आहे.(Image Source : Google)
युनायटेड नेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली बॉम्बस्फोटानंतर उत्तर गाझामधील किमान चार रुग्णालये पूर्णपणे उदध्वस्त झाली आहेत. इस्रायलने गाझा पट्टीतील 21 इतर रुग्णालये रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.(Image Source : Google)
जागतिक संघटनेनं सांगितलं आहे की, गाझा पट्टीमध्ये 400,000 हून अधिक पॅलेस्टिनी संयुक्त राष्ट्रांच्या शाळा आणि इमारतींमध्ये आश्रय घेत आहेत. (Image Source : Google)
युनायटेड नेशन्स पॅलेस्टाईन एजन्सीने म्हटले आहे की, युद्धामुळे वृद्ध, मुले, गर्भवती महिला आणि अपंग लोकांना त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जात आहे. हे पूर्णपणे चूकीचं आहे.(Image Source : Google)
गाझा शहराचा ताबा घेण्यासाठी आणि गाझा पट्टी नष्ट करण्यासाठी इस्रायलने 10,000 सैन्य पाठवण्याची योजना आखली आहे. (Image Source : Google)
दरम्यान, युद्धाच्या काळात इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन अजय हाती घेण्यात आलं आहे. आतापर्यंत 600 हून अधिक भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत. (Image Source : Google)