Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांची चौथी तुकडी दिल्लीत दाखल, 274 भारतीय सुखरुप मायदेशी
Israel-Hamas Conflict : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने ऑपरेशन अजय हाती घेतलं आहे.
Israel Palestine War Operation Ajay
1/9
इस्रायलहून भारतीयांची चौथी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये 250 हून अधिक भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत.
2/9
इस्रायलमधून भारतात सुखरूप परतलेल्यांच्या पहिल्या तुकडीत महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण 274 लोक भारतात सुखरुप पोहोचले आहेत.
3/9
इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारताच्या ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन येणारे चौथे विमान रविवारी सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोहोचले.
4/9
यामध्ये 274 भारतीय प्रवाशांना घेऊन या विमान दिल्लीत पोहोचलं. इस्रायलहून भारतात परतणाऱ्या प्रवाशांची निवड 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर करण्यात आली.
5/9
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सकाळी ट्विटरवरून माहिती देत फोटो शेअर केले आहे.
6/9
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने ऑपरेशन अजय हाती घेतलं आहे. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 500 हून भारतीय सुखरुप परतले आहेत.
7/9
इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 4500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 12000 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
8/9
याआधी इस्रायलहून भारतीयांच्या तीन तुकड्या भारतात पोहोचल्या आहेत. पहिल्या तुकडीत 212 भारतीय, दुसऱ्या तुकडीत 235 भारतीय आणि आता तिसऱ्या तुकडीत 197 भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत.
9/9
इस्रायल-हमास संघर्ष सुरुच आहे. जगभरातील अनेक देश हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Published at : 15 Oct 2023 03:24 PM (IST)