Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
In Pics : सूर्या-विराटसंह रोहितची फटकेबाजी, मग बोलर्सची कमाल गोलंदाजी, भारताचा नेदरलँडवर 56 धावांनी विजय
टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवत पाकिस्तान पाठोपाठ आता नेदरलँडवर दमदार असा विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं आधी दमदार फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजी करत 56 धावांनी नेदरलँडला मात दिली.
यावेळी आधी फलंदाजी करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतक झळकावली.
यामध्ये रोहितने 53, सूर्यकुमारने नाबाद 51आणि विराटने नाबाद 62 धावा करत मोलाचं योगदान दिलं.
त्यानंतर 180 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या नेदरलँडची सुरुवातच खास झाली नाही.
भारतीय गोलंदाजांनी नेदरलँडच्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, तसंच विकेट घेणंही कायम ठेवलं.
20 षटकात 123 धावांवर नेदरलँडला भारतानं रोखलं. ज्यामुळे भारत 56 धावांनी सामना जिंकला.
यावेळी भारताकडून आर आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमार या चारही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
विशेष म्हणजे या विजयासह भारताच्या नावावर 4 गुण झाले असून नेट रनरेटही भारताचा +1.425 झाला आहे. म्हणून ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी आहे.
25 चेंडूत नाबाद 62 धावा ठोकणाऱ्या मुंबईकर सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून सन्मानित केलं.