In Pics : आधी दमदार बॅटिंग, मग कडक फिल्डिंग, भारताचा बांगलादेशवर 5 धावांनी विजय
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारतानं 5 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ, मग पावसाचा व्यत्यय, ओव्हर्ससह टार्गेटमध्ये बदल झाल्यानंतर अखेर भारतानं 5 धावांनी सामना जिंकला आहे.
अगदी रोलरकोस्टर राईडप्रमाणे झालेला सामना अखेर भारताच्या बाजूने झुकला. आधी फलंदाजी करत भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. सलामीवीर लिटन दासनं एकहाती सामना बांगलादेशला जिंकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण केएलनं केलेनं 8 व्या षटकांत केलेल्या एका थरारक थ्रोनं दासला धावचीत केलं आणि तिथून सामना फिरला.
पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळं 16 षटकात बांगलादेश 145 धावाच करु शकला आणि ज्यामुळं भारतानं 5 धावांनी जिंकला.
सामन्यात भारताचा युवा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अर्शदीपनं उल्लेखणीय कामगिरी करत एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्याच पण डेथ ओव्हर्समध्येही चांगली गोलंदाजी केली.
विशेष म्हणजे भारताचा सलामवीर केएल राहुल आजच्या सामन्यातून पुन्हा एकदा फॉर्मात परतला. त्यानं 50 धावा करत दमदार अर्धशतक झळकावलं.
विराटनं आजही भारताची फलंदाजी सावरत नाबाद 64 धावा केल्या.
सामनावीर म्हणून भारताकडून नाबाद 64 धावा करणाऱ्या विराट कोहलीला गौरवण्यात आलं.
भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवत ग्रुप 2 मध्ये अव्वलस्थान मिळवलं आहे.