IND vs SL ODI World Cup 2023: रोहितसेना सुस्साट... वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेची घरवापसी, 302 धावांनी भारताचा विजय
टीम इंडियाने आपला वर्ल्डकपमधील धुवाँधार कामगिरीचा आलेख कायम ठेवताना थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला.
. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली.
भारताच्या शुभमन गिलचं शतक आठ धावांनी हुकलं. सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचं विराट कोहलीचं स्वप्नही 12 धावांनी भंगलं.
भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकूटानं श्रीलंकेचा डाव धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची संधी दिली नाही.
: मोहम्मद सामीने यंदाच्या विश्वचषकात दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. शामीने यंदाच्या विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.
यासह त्याने विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम झहीर खान याच्या नावावर होता.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची संधी दिली नाही. 358 धावांचा बचाव करताना पहिल्या चेंडूपासूनच लंकेवर वर्चस्व गाजवले.