बांगलादेशचा सलग सहावा पराभव, पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत
पाकिस्तानचा सात सामन्यांमधला हा तिसरा विजय ठरला. त्यामुळं पाकिस्तानच्या खात्यात सहा गुण झाले असून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाकिस्ताननं पाचव्या स्थानावर झेप घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीत पुन्हा स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.
दरम्यान, कोलकात्यातल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला विजयासाठी २०५ धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा अख्खा डाव २०४ धावांत आटोपला.
शाहिन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वासिमनं प्रत्येकी तीन, तर हॅरिस रौफनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर पाकिस्ताननं ३२ षटकं आणि तीन चेंडूंमध्ये विजयी लक्ष्य गाठलं.
सलग चार पराभवानंतर पाकिस्तान संघाला विजय मिळाला आहे. या विजयासह पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत आहेत. बांगलादेशचं विश्वचषकातील आव्हान संपलेय.