IND vs BAN : भारत आणि बांगलादेशी खेळाडूंच्या पगारात मोठा फरक, मॅच फीसुद्धा 5 पट
विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाचा पुढील सामना बांगलादेश विरुद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयसीसी वनडे क्रमवारीत दोन्ही संघांमध्ये मोठा फरक आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या पगारातही ही तफावत दिसून येते.
बीसीसीआयकडून भारतीय क्रिकेटपटूंची चार गटात ए प्लस, ए, बी आणि सी अशी विभागणी केली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश क्रिकेट बोर्डही आपल्या खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागून दरवर्षी करारबद्ध करते.
बीसीसीआयच्या ‘ए प्लस’ श्रेणीतील करार असलेल्या क्रिकेटपटूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. याउलट, बीसीबी आपल्या 'ए प्लस' (A+ Grade) श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 48 लाख रुपये देते.
भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘अ श्रेणी’ क्रिकेटपटूंना वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या 'अ श्रेणी' (A Grade) क्रिकेटपटूंना वार्षिक 36 लाख रुपये मानधन मिळते.
बीसीसीआयच्या 'बी श्रेणी' (B Grade) यादीत समाविष्ट असलेल्या क्रिकेटपटूंना वार्षिक 3 कोटी रुपये मिळतात. बांगलादेशमध्ये या श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी 24 लाख रुपये दिले जातात.
भारतात ‘क’ श्रेणीतील क्रिकेटपटूंनाही वर्षाला एक कोटी रुपये मिळतात. बांगलादेशमध्ये 'सी श्रेणी' क्रिकेटपटूंना वर्षाला फक्त 12 लाख रुपये मिळतात.
भारत आणि बांगलादेशच्या क्रिकेटपटूंच्या वार्षिक करारात जसा फरक आहे, तसाच सामना शुल्कातही फरक आहे.
भारतीय क्रिकेटपटूंना कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये मिळतात.
दुसरीकडे, बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना कसोटीसाठी 3 लाख रुपये, वनडेसाठी 2 लाख रुपये आणि टी-20 साठी 1 लाख रुपये मिळतात.