ICC World Cup 2023 : रंगणार विश्वचषकाची खेळी, कोण ठरणार यंदाचा मानकरी?
8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीचा सामना होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा थरार रंगणार आहे.
वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे.
भारतामधील 12 मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.
सेमीफायनलचे सामने कोलकाता आणि मुंबईच्या मैदानावर होणार आहेत. अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाच सामने होणार आहेत. यामध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील उद्घाटानाचा सामना होणार आहे. त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारही याच मैदानावर होणार आहे.