PM Modi Visit Pyramids of Giza: इजिप्त दौऱ्यावेळी मोदींनी दिली ऐतिहासिक गिझा पिरॅमिड्सना भेट; ट्वीट करुन इजिप्तच्या पंतप्रधानांचे मानले आभार
पंतप्रधान मोदी आधी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तिथून ते इजिप्तच्या दौऱ्यावर गेले. आपला इजिप्त दौरा आटपून मोदी मध्यरात्री मायदेशी परतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या दोन दिवसीय इजिप्त दौऱ्यादरम्यान मोदींनी इजिप्तमधील काही ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.
पंतप्रधान मोदींनी जगातील आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या गिझामधील पिरॅमिड्सना भेट दिली. त्यावेळी पंतप्रधान मोदींसोबत इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मॅडबौली (Mostafa Madbouly) देखील होते.
गिझा येथील पिरॅमिड्सचा समावेश जगातील सात आश्चर्यांमध्ये होतो. जगभरातील पिरॅमिड्सपैकी गिझामधील पिरॅमिड्स सर्वात विशाल आहेत.
पंतप्रधान मोदींनी गिझा येथील नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर बांधलेल्या चौथ्या राजवंशाच्या तीन पिरॅमिड्सना भेट दिली.
विशाल पिरॅमिड्स पाहिल्यानंतर मोदींनी त्यासंदर्भात ट्वीटही केलं. ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
मोदींनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, मला गिझा येथील विशाल पिरॅमिडचं दर्शन घडवल्याबद्दल मी पंतप्रधान मुस्तफा मॅडबौली यांचे आभार मानतो. आम्ही यावेळी दोन्ही राष्ट्रांच्या सांस्कृतिक इतिहासावर आणि आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध कसे अधिक घट्ट करायचे याबद्दल चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यानंतर शनिवारी 24 जून रोजी इजिप्त दौऱ्यावर पोहोचले होते. पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर 25 जून रोजी मध्यरात्री भारतात परतले.
पंतप्रधान मोदींनी इजिप्तमधील कैरो येथील 11व्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीलाही (Al-Hakim Mosque) भेट दिली. भारतातील दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीनं या मशिदीचं नूतनीकरण करण्यात आलं आहे.