Hardik Pandya : टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष, हार्दिक पांड्याने दाखवली ट्रॉफी
T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया भारतात आली असून थोड्याच वेळात ती मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवरील कार्यक्रमासाठी पोहोचणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया नरिमन पॉईंटकडे रवाना झाली.
नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअम अशी टीम इंडियाची ओपन डेकमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यासाठी क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) दाखल झाले आहेत.
आयपीएलवेळी ज्या मैदानावर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीकेचा धनी झाला होता, त्याच पांड्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी नरिमन पॉईंटकडे जात असताना हार्दिक पांड्याने एबीपी माझाच्या कॅमेरात विजयाची ट्रॉफी दाखवली.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरिन ड्राईव्हवर जवळपास तीन लाखाहून जास्त चाहत्यांचा महापूर उसळला आहे.
मरिन ड्राईव्हवरून ओपन डेकवरून टीम इंडियाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे.