ENG vs NZ WC 2023: विश्वचषकाच्या महायुद्धाला सुरुवात, पण अहमदाबादचं रणांगण रिकामचं
ज्या स्पर्धेची संपूर्ण क्रिक्रेटविश्व अगदी आतुरतेने वाट बघतं त्या स्पर्धेची अखेर सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडली.
पण ज्या स्टेडियमवर या सामन्याची सुरुवात झाली ते अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम मात्र रिकामच पाहायला मिळालं.
सव्वा लाखापेक्षा अधिक क्षमतेचं हे स्टेडियम पहिल्याच सामन्यात रिकामं राहिलं.
भारतामध्ये क्रिकेटचे चाहते काही कमी नाहीत.
पण तरीही अहमदाबादचं हे मैदान मात्र रिकामचं राहिलं.
ज्या अहमदाबादमध्ये आजचा सामना खेळवण्यात आला त्या अहमदाबादकरांसाठी गुरुवारचा दिवस हा कामाचा असतो.
त्यामुळे स्टेडियम गर्दी झाली असं देखील सांगण्यात येत आहे.
तर अहमदाबाचं तापामान देखील जास्त असल्याने जास्त प्रेक्षक सामना पाहायला आलेच नाहीत, असं देखील म्हटलं जात आहे.
पण याच मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या पुढील सामन्यांना तरी प्रक्षेक येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.