World Cup 2023 : भारत विजयाचा दावेदार का? कोणती कारणे?
Team India At World Cup : यजमान भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात चेन्नईच्या मैदानातून आस्ट्रेलियाविरोधात होत आहे. आठ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील 12 वर्षांपासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर विश्वचषक विजयासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानाववर आहे. भारताने नुकतेच आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने मात दिली होती.
रनमशीन विराट कोहली भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विश्वचषकातील भारतीय खेळाडूमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. विराट कोहलीने वनडेमध्ये 13083 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 57.38 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 47 शतकांची नोंद आहे. त्याशिवाय 66 अर्धशतके ठोकली आहेत. विराट कोहलीने विश्वचषकात एक हजार पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत.
गोलंदाजीबाबत विचार केल्यास रविंद्र जाडेजा वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रविंद्र जाडेजाने 204 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात खेळत असलेल्या भारतीय गोलंदाजात रविंद्र जाडेजा यशस्वी गोलंदाज आहे. जाडेजाने आतापर्यंत 202 विकेट घेतल्या आहेत.
यजमान भारताला घरच्या परिस्थितीचा फायदा होणार आहे. मैदान, खेळपट्टी आणि परिस्थिती याची टीम इंडियाला पुरेपूर माहिती आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाला जास्त फायदा होणार आहे. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला फायदा झाला.2011 नंतर झालेल्या सर्व यजमान संघांनी विश्वचषकावर नाव कोरलेय. आता पुन्हा एकदा भारतीय संघ चषक उंचावणार का?
विश्वचषकाआधी टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आगे. आशिया चषकात भारताने आपला दबदबा कायम ठेवत एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाला लोळवलं. भारतीय संघ वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. भारतीय संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेला 60 धावाही करुन दिल्या नाहीत. तर पाकिस्तानविरोधात 66 वर 4 विकेट गमावल्यानंतरही कमबॅक केले होते. भारतीय संघ फक्त आघाडीच्या तीन फलंदाजावर अवलंबून नाही... प्रत्येक फलंदाज, खेळाडू फॉर्मात आहे. गोंदाजीतही भारताचा दबदबा कायम आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
विश्वचषकात सहभागी असणाऱ्या दहा संघामध्ये भारतीय संघ सर्वात संतुलित दिसत आहे. भारताकडे सलामीला अनुभवी रोहित शर्मा आहे, त्याच्या जोडीला युवा शुभमन गिल आहे. तर तिसर्या क्रमांकावर असणारा विराट भन्नाट फॉर्मात आहे. मध्यक्रममध्ये राहुल आणि अय्यरही भन्नाट फॉर्मात आहे. इशान आणि सुर्या यांनीही धावांचा पाऊस पाडला आहे. जाडेजा आणि हार्दिक आपले काम चोख बजावत आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहच्या जोडीला मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव हे प्रभावी मारा करत आहे. त्यामुळेच भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
विश्वचषकात खेळणाऱ्या 15 सदस्य सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. सिराज, बुमराह आणि शामी यांनी गोलंदाजीत भेदक मारा केलाय. तर गिल याने वर्षभरात 1200 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. विराट - रोहितही फॉर्मात आहे. राहुल आणि अय्यर यांचे दमदार कमबॅक झालेय. कुलदीप यादवच्या जाळ्यात दिग्गज फलंदाजही अडकत आहेत. आशिया चषकाच्या फायनलमध्ये सिराजचा माऱ्यापुढे श्रीलंका 60 धावाही करु शकली नाही. भारताचा संपूर्ण संघच सध्या फॉर्मात आहे.
विश्वचषकासारख्या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंची मोठी जबाबदारी असते. भारताकडे चार मोठे अष्टपैलू खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या भारतासाठी गेमचेंजर ठरु शकतो. हार्दिक पांड्या भारताचा हुकमाचा एक्का होऊ शकतो. हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देऊ शकतो. त्याशिवाय तो उप कर्णधारही आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचा फॉर्म भारतासाठी महत्वाचा आहे. आघाडीची फळी ढेपाळली तर मध्यक्रममध्ये हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी असेल.