Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोणाकडे; कोल्हापूर की मुंबई कोण मारणार बाजी?
महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) स्पर्धा तब्बल दोन वर्षानंतर पार पडत आहे. कोरोना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा मागील दोन वर्षे झाली नव्हती, पण आता साताऱ्यात ही स्पर्धा पार पडत असून आज अंतिम सामना होणार आहे.
अंतिम सामन्यात विजेत्या पैलवानाला मिळणारी मानाची गदा मैदानात दाखल झाली आहे.
या कुस्तीत खुल्या म्हणजे ८६ ते १२५ किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने आहेत.
विशेष म्हणजे दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील एक पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत आहे.
आजच्या सामन्यात आमनेसामने असणारे पृथ्वीराज आणि विशाल यांच्यात पृथ्वीराजला मॅटवरच्या कुस्त्यांचा तसंच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अधिक अनुभव आहे.
पण दुसरीकडे विशाल उर्फ प्रकाश कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत तयार झाला आहे. त्याचे काका तानाजी बनकर यांनीही 1987 साली महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्यामुळे आजची लढत चुरशीची होणार यात शंका नाही.
पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदरआबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला.
दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्यास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळणार आहे.
विजेत्या पैलवानाला मानाची गदा आणि बक्षीस मिळणार आहे.