Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया किमतीत विकल्यानंतर तो या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानावर राहिला.
अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले.
चला तर मग जाणून घेऊया ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या महागड्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रता काय आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंतने बीकॉमची पदवी घेतली आहे.
त्याने दिल्ली विद्यापीठाच्या व्यंकटेश्वर महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरकडे सुद्धा बीकॉमची पदवी आहे.
अय्यरने मुंबईच्या आरए पोद्दार कॉलेजमधून वाणिज्य आणि अर्थशास्त्रात बी.कॉम केले आहे.
ऋषभ पंतने आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत.
श्रेयस अय्यरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 116 सामने खेळले आहेत.