Vikrant Massey Movies on OTT: 12th Fail ते सेक्टर 36 पर्यंत; विक्रांत मेस्सीचे 'हे' चित्रपट नाही पाहिले तर काय पाहिलं?
विक्रांत मेस्सी त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्यानं निवृत्तीची घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे. विक्रांतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविक्रांतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अभिनयातून सन्यास घेत असल्याची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्ष खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसा मी पुढे जातोय, तसतसं मला समजतं की, आता घरी जाण्याची वेळ आलीय. पती, वडील आणि मुलगा म्हणून... आणि अभिनेता म्हणूनही... त्यामुळे येत्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी... पुन्हा धन्यवाद... प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी राहीन.
आज आम्ही तुम्हाला विक्रांतच्या काही उत्कृष्ट चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही OTT वर पाहू शकता. यावर्षी विक्रांतचा सेक्टर 36 हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
विक्रांत मेस्सीचा गॅसलाइटही चर्चेत होता. यामध्ये सारा अली खान आणि चित्रागंदा सिंहनं विक्रांतसोबत स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.
मिर्झापूरमध्ये बबलू पंडितची भूमिका साकारून विक्रांत मेस्सीनं सर्वांना आश्चर्यचकित केलं. पहिल्या पार्टमध्ये त्याच्या मृत्यूनंतर चाहत्यांना खूप दुःख झालेलं. तुम्ही गाजलेली वेब सीरिज प्राईम व्हिडीओवर मिर्झापूर पाहू शकता.
विक्रांत मेस्सीनं दीपिका पदुकोणसोबत छपाकमध्ये काम केलं होतं. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
12th Fail नंतर विक्रांत मेस्सीच्या करिअरला हाईप मिळाली. या चित्रपटानं त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.
नुकताच विक्रांतचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती अद्याप समोर आलेली नाही.