अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदासाठी 800 फूट उंच नागफणी कड्यावर बॅनर
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्हातील लोणावळा लगतच्या नागफणी कडा चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. असा हा कठीण असलेला ड्युक्स नोज उर्फ नागफणी कड्यावर हा बॅनर झळकावला आहे.
गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते.
विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे.
या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.
या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरीत्या चढाई करतात.