In Pics | संजना- जसप्रीतच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण

भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि टीव्ही शो प्रेझेंटर संजना गणेशन यांच्या विवाहसोहळा सोमवारी पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोशल मीडियावर या सेलिब्रिटी जोडीने त्यांच्या विवाहसोहळ्याती काही खास क्षणांचे फोटो पोस्ट केले, ज्यानंतर नेटकऱ्यांनीही या नवविवाहित जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

विवाहसोहळ्यासोबतच या त्यापूर्वी पार पडलेल्या काही विधी आणि समारंभांचे फोटोही यामागोमागच सोशल मीडियायवर व्हायरल झाले.
पाहता पाहता भारतीय क्रिकेटपटू बुमराह आणि त्याची जोडीदार संजना सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आले.
हळदी समारंभातील काही फोटोही अनेकांच्याच भेटीला आले.
या फोटोंमध्ये संजना आणि जसप्रीत यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली. अतिशय खासगी समारंभात या दोघांची लग्नगाठ बांधली गेली.
अगदी विवाहसोहळा संपन्न होईपर्यंत त्याबाबतची अधिक माहितीसुद्धा समोर आली नव्हती.
संजना आणि जसप्रीतच्या या विवाहसोहळ्याशी संबंधित आणखी एका विषयाचीही चर्चा रंगली, ही चर्चा होती या सेलिब्रिटी जोडीच्या वेशभूषेची.
अतिशय सुरेख रंगसंगतीसह संजना आणि जसप्रीतचा वेडिंग लूकही आकर्षणाचा विषय ठरला.
(सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)