Latur Lockdown | लातुरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या तीन दिवसात जवळपास 550 रुग्ण वाढले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही एक हजाराच्या वर गेली आहे. परिणामी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्ह्यात नवीन नियमावली लागू केली आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
लातूर शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या गंजगोलाईची छायाचित्रे असून सोळा रस्ते या भागात एकत्र येतात. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
सर्वच प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, यात्रा, उर्स, सामूहिक नमाज, सभा संमेलने, आंदोलनाना पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
मागील काही दिवसांपासून रोज करोना बाधितांचा आकडा 100 च्या पुढे जात आहे.यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
लातुरमधील पेट्रोलपंपवर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
गोलाईतील कायम गजबजलेली कापड लाईन (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
लातूरमधील हनुमान चौकातील चित्र (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
प्रत्येक रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या दुकानात कायमच गर्दी असते मात्र रात्री आठ नंतर येथे सामसूम होती यावेळी मोठा पोलीस बंदोस्त लावण्यात आला होता. (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
15 मार्चपासून लातूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. तर जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )