'शेवटच्या क्षणी त्यानं लग्न मोडलं, का ते मलाही ठाऊक नाही'; नीना गुप्ता यांच्या जीवनातील आणखी एक गुपित सर्वांसमोर
छाया सौजन्य - सोशल मीडिया
1/6
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कायमच त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी सर्वांसमोर मोकळेपणाने मांडल्या आहेत. वैवाहिक जीवन असो किंवा कलाविश्वातील आपला प्रवास असो. त्यांनी कायमच या साऱ्याकडे सकारात्मकतेनं पाहिलं. अशी ही मोठ्या मनाची अभिनेत्री 'सध्या सच कहूँ तो..', या आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. या पुस्तकातून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक टप्प्यांवर प्रकाश टाकला आहे.
2/6
अभिनेत्री करीना कपूर खान हिच्याशी आपल्या या पुस्तकाबाबत संवाद साधताना नीना यांनी आपलं लग्न अगदी शेवटच्या क्षणी मोडल्याचं गुपित समोर आणलं.
3/6
'इथं मी एका व्यक्तीबाबतही बोलले आहे, ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं. अगदी शेवटच्या क्षणी मी दिल्लीमध्ये कपडे बनवून घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याचा फोन आला आणि मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, असं तो म्हणाला', असं त्यांनी सांगितलं.
4/6
आजपर्यंत आपल्याला ठाऊकच नाही, की असं नेमकं का झालं. पण, मी काय करु शकते. मला त्याच्याशी लग्नबंधनात अडकायला आवडलं असतं. किंबहुना मला त्याच्या कुटुंबाबद्दल, वडिलांबद्दल कमालीचा आदर होता. मी त्यांच्या घरात राहत होते, असं म्हणत आयुष्यातील या टप्प्याबाबत त्या मोकळेपणानं बोलल्या.
5/6
आपण लिहिलेल्या पुस्तकातील हा मुद्दा तो आताही वाचेल, तो सध्या आनंदात असून, वैवाहिक आयुष्यातही आनंदात आहे. त्यांला मुलंही आहेत असं नीना यांनी सांगितलं.
6/6
मसाबा या आपल्या मुलीचं संगोपन करतेवेळी एकल मातृत्त्वामध्ये आपल्याला नेमक्या काय अडचणी आल्या, याचा खुलासाही त्यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)
Published at : 16 Jun 2021 09:38 AM (IST)