Krishna Nagar: कृष्णा नागरचा 'सुवर्ण' प्रवास, भारताला मिळवून दिलं पाचवं गोल्ड मेडल

Krishna Nagar : पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागरनं (Krishna Nagar) इतिहास रचला आहे. कृष्णानं भारताच्या खात्यात पाचवं सुवर्णपदक आणलं आहे.(photo courtesy : @krishnanagar99/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज सकाळी सुहास यथिराजनं रौप्यपदकं भारताच्या खात्यात मिळवून दिल्यानंतर कृष्णानं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्यानं हॉन्गकॉन्गच्या चू मान कायचा 2-1 असा पराभव केला.(photo courtesy : @krishnanagar99/IG)

पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरनं पहिला सेट 21-17 असा जिंकला. तर हॉन्गकॉन्गच्या चू मान कायनं दुसरा सेट जिंकत वापसी केली.(photo courtesy : @krishnanagar99/IG)
शेवटचा तिसरा सेट जिंकत कृष्णानं भारताला पाचवं सुवर्णपदक जिंकून देत इतिहास रचला आहे.(photo courtesy : @krishnanagar99/IG)
कृष्णानं काल झालेल्या सेमीफायनलमध्ये त्यानं ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली होती.(photo courtesy : @krishnanagar99/IG)
त्याआधी सुहास यथिराजनं ( Suhas L Yathiraj ) इतिहास रचला. त्यानं बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं.(photo courtesy : @krishnanagar99/IG)