T20 World Cup 2021 खेळणारे जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू, विराट नंबर वन, मिळकत जाणून थक्क व्हाल!
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या यादीत एक नंबरवर आहे. कोहलीकडे 450 कोटी रुपयांची (60 मिलियन डॉलर) संपत्ती आहे. BCCIनं विराटला A+ ग्रेड मध्ये ठेवलं आहे. त्याला वर्षाकाठी 7 कोटी रुपए वेतन मिळतं. सोबतच IPLमध्ये RCBकडून त्याला 17 कोटी रुपए मिळतात. तसेच एका रिपोर्टनुसार इंस्टाग्राम अकाउंटवर प्रमोशनल पोस्टसाठी विराट 5 कोटी रुपये घेतो. विराटनं जगातील अनेक महत्वाच्या ब्रॅंड्सच्या जाहिराती केल्या आहेत. (Photo tweeted by @RCBTweets)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत दुसरं नाव आहे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस(Pat Cummins). पॅट कमिंसचं नेटवर्थ 308 कोटी रुपये आहे. केकेआरनं त्याला मागील ऑक्शनमध्ये 15.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. (Photo:@patcummins30/FB)
वेस्टइंडीजचा धाकड फलंदाज क्रिस गेल(Chris Gayle) शानदार आणि आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. गेलचं नेटवर्थ 262 कोटी रुपये आहे. गेल वर्षाकाठी 36 कोटी रुपये कमावतो अशी माहिती आहे. (Photo:@ChrisGayleSpartan/FB)
बांग्लादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसनचं (Shakib Al Hasan)नेटवर्थ 262 कोटी रुपये आहे. IPL मध्ये KKR कडून शाकिबला वर्षाकाठी 3.2 कोटी रुपये वेतन म्हणून मिळतात. (Photo: Shakib Al Hasan/FB)
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथचं (Steve Smith)नेटवर्थ जवळपास 187 कोटी रुपये आहे. तो अनेक ब्रॅंड्सचा अॅम्बेसिडर आहे. IPL मध्ये दिल्लीकडून त्याला वर्षाला 2.2 कोटी रुपये मिळतात. त्याची गुंतवणून रियल इस्टेट प्रॉपर्टीमध्येही असल्याची माहिती आहे. (Photo: @SteveSmith/FB)