In Pics : रायबरेली हॉकी स्टेडियमला रानी रामपालचा नाव, 'रानीज गर्ल्स हॉकी टर्फ' म्हणून ओळखलं जाणार
भारतीय संघाची स्टार हॉकीपटू राणी रामपाल हीचा अनोखा आणि मोठा सन्मान करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचं नाव रायबरेली येथील हॉकी स्टेडियमला देण्यात आलं आहे.
मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेलीने हॉकी स्टेडियमचे नाव बदलून ‘राणी’ज गर्ल्स हॉकी टर्फ’ असे ठेवले आहे.
विशेष म्हणजे हॉकी खेळातील ती पहिली महिला खेळाडू आहे जिचं नाव एका स्टेडियमला देण्यात आलं आहे.
राणीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. या फोटोंमध्ये ती खेळाडूंशी संवाद साधताना आणि इतर स्टाफ सदस्यांसह स्टेडियमचे उद्घाटन करताना दिसत आहे.
राणीने तिच्या ट्विटर हँडलवर फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द खूप कमी वाटतात. MCF रायबरेलीने हॉकी स्टेडियमचे नाव बदलून “राणी’स गर्ल्स हॉकी टर्फ असे केल्याने हॉकीमधील माझ्या योगदानाचा सन्मान केला आहे.”
तसंच, “माझ्या नावावर स्टेडियम असणारी मी पहिली महिला हॉकीपटू ठरल्याने हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. मी हे भारतीय महिला हॉकी संघाला समर्पित करते आणि मला आशा आहे की यातून महिला हॉकीपटूंच्या पुढील पिढीला प्रेरणा मिळेल!” असंही राणी म्हणाली.
FIH महिला हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये बेल्जियमविरुद्ध शेवटचा सामना खेळल्यानंतर राणी संघात परतली होती. 28 वर्षीय राणी टोकियो ऑलिम्पिकपासून दुखापतीचा सामना करत होती आणि त्यानंतर तिला वर्ल्ड कप आणि कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या संघातून ही वगळण्यात आले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात राणीने भारतीय संघात पुनरागमन केले होते, तेव्हा तिचा 22 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता.
राणीने पोस्ट केलेल्या या फोटोंवर नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.