Bharat Gaurav Deluxe Tourist Train : मिनी लायब्ररी, फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; भारतीय रेल्वेची विशेष ट्रेन
भारतीय रेल्वेने भारत गौरव डिलक्स पर्यटक ट्रेन सुरु केली, जी ईशान्य भारत (North East India) सर्किट पूर्ण करण्यासाठी नवी दिल्लीहून रवाना झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही ट्रेन आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यात जाईल. ही ट्रेन 15 दिवसांत ईशान्य भारत सर्किटचा प्रवास करेल. ईशान्य भारत सर्किटची थीम नॉर्थ ईस्ट डिस्कव्हरी: बियॉन्ड गुवाहाटी अशी आहे.
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत आणि देखो अपना देश या उपक्रमांतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे.
दिल्ली, गाझियाबाद, अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर, लखनौ आणि वाराणसी इथून या ट्रेनमध्ये बोर्डिंग आणि डी-बोर्डिंगला परवानगी असेल. या डिलक्स एसी ट्रेनमध्ये एकूण 156 पर्यटक प्रवास करु शकतात. यात 1 एसी आणि 2 एसी कोचची व्यवस्था आहे.
आधुनिक डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनमध्ये दोन उत्तम रेस्टॉरंट्सशिवाय मिनी लायब्ररीसारख्या अनेक सुविधा उपलब्ध असतील.
जर आपण या ट्रेनच्या भाड्याबद्दल बोललो तर ते एसी 2-टायरमध्ये प्रति व्यक्ती 1,06,990 रुपये, एसी-1 केबिनमध्ये प्रति व्यक्ती 1,31,990 रुपये आणि एसी-1 कूपमध्ये 1,49,290 रुपये प्रति व्यक्तीपासून सुरु होतं.
तिकिटामध्ये रेल्वे प्रवास, हॉटेलमध्ये मुक्काम, सर्व शाकाहारी जेवण, संबंधित शहरांमध्ये प्रेक्षणीय स्थळे पाहणं आणि इतर खर्चाव्यतिरिक्त प्रवास विमा शुल्काचा समावेश आहे.