Pune news : तीन पिढ्यानंतर घरात झाला मुलीचा जन्म; वाजत-गाजत केलं लेकीचं स्वागत
घरात लेक जन्माला आली की अनेक लोक नाक तोंड मुरडतात. मुलगा जन्माला आला नाही म्हणून अनेकजण नाराज झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र लेकीच्या जन्माचा पुण्यात मोठा सोहळा साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे वाजत गाजत मिरवणूक काढून फटाके वाजवीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नववर्षात घरी स्वागत करण्यात आलं.
पुण्यातील बोपोडी परिसरात राहणाऱ्या मंगेश गायकवाड यांनी घरातील कन्यारत्नाचं वाजत जागत स्वागत केलं आहे.
मंगेश गायकवाड यांच्या घरी तिसर्या पिढी नंतर कन्यारत्न झाले असून आजोबा मंगेश किसन गायकवाड यांनी जलोषात नातीचे स्वागत केले. कन्यारत्नाचे घरी येताच घरातील सुवासिनी कन्येसह तिच्या आईला औक्षण केले.
कन्यारत्न येणार्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. यासह घराला सुंदर सजावट केले होेते. लक्ष्मीच्या रूपाने चिमुकली आपल्या घरी आली, या भावनेने तिची पाऊलं कुंकवाच्या पाण्यात भिजवून घरात उमटविली गेली.
त्यानंतर देवघरात दर्शन घेऊन चिमुकलीला आकर्षक फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवण्यात आले.
लेकीच्या स्वागतसाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. आजोबा मंगेश गायकवाड यांनी एक आगळा संदेश देत मुलगी वाचावा, असा संदेश दिला.
लेक घरातील लक्ष्मी असते असं सांगत त्यांनी नातीच्या जन्माचा सोहळा साजरा केला.