PM Narendra Modi : पीएम मोदींचा टीम इंडियाला मानसिक आधार, पोहोचले ड्रेसिंग रुममध्ये..
2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभव भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. (Photo Credit : X/@mygovindia)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App43व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने दोन धावा काढताच कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. (Photo Credit : X/@mygovindia)
पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कॅप्टन रोहित शर्मा लगेच ड्रेसिंग रूममध्ये गेला. मोहम्मद सिराज मैदानावरच रडू लागला. (Photo Credit : X/@mygovindia)
हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला पोहोचले होते. (Photo Credit : X/@mygovindia)
फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मानसिक धक्क्यात गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. (Photo Credit : X/@mygovindia)
पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संपर्क साधला आणि त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. (Photo Credit : X/@mygovindia)
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (Photo Credit : X/@mygovindia)
यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमची टूर्नामेंट खूप चांगली होती पण काल आम्ही हरलो. आपण सर्व दु:खी आहोत पण आपल्या लोकांचा पाठिंबा आपल्याला पुढे नेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल ड्रेसिंग रुमची भेट विशेष आणि खूप प्रेरणादायी होती.(Photo Credit : X/@mygovindia)
वर्ल्डकप फायनलनंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर लिहिले, 'प्रिय टीम इंडिया, विश्वचषकातील तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय उल्लेखनीय होता. तुम्ही मोठ्या भावनेने खेळून देशाचा गौरव केला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.'(Photo Credit : X/@mygovindia)
ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन करताना त्यांनी लिहिले की, 'विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! संपूर्ण स्पर्धेत त्यांची कामगिरी प्रशंसनीय होती ज्याचा शेवट दणदणीत विजयाने झाला. आजच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन.(Photo Credit : X/@mygovindia)