Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Pollution: दिल्लीतील प्रदूषणावाढ मृत्यूला कारणीभूत ठरेल, एम्सचे माजी संचालक नेमकं काय म्हणाले?
दिल्लीमध्ये सातत्याने प्रदूषणामध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच मुद्द्यावर तज्ज्ञांनी देखील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत म्हटलं की, राजधानी दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे.
एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, दिल्लीची हवा सातत्याने प्रदूषित होत आहे. आरोग्यावरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रदूषण हा सायलेंट किलर बनला आहे. ते कोणत्याही परिस्थितीत संपवणं आवश्यक आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या हृदयावर, मेंदूवर आणि श्वासाचा त्रास असणाऱ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचं तज्ञ्जांनी म्हटलं आहे.
संशोधनात असेही समोर आले आहे की, प्रदूषणात वाढ झाल्यामुळे मुलांना केवळ दम्याचा त्रास होत नाही तर त्यांची बुद्धीही कमी होते. प्रदूषणावर लवकरात लवकर प्रभावी कारवाई न केल्यास समस्या मोठी होऊ शकते.
दिल्लीतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता, AIIMS येथे वायु प्रदूषण आणि आरोग्य - विज्ञान, धोरण, कार्यक्रम आणि समुदाय सहभागावर पुढे जाण्यासाठी कृती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्रात आरोग्य तज्ज्ञांनी अनेक प्रभावी उपाय सुचवले आहेत.
प्रदूषण रोखण्यासाठी एक टास्क फोर्स देखील तयार केला जाऊ शकतो, जो राज्यांमधील प्रदूषणाचे घटक समजून घेईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलेल.
सायन्स मॅगझिन लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतात एका वर्षात सुमारे 24 लाख लोकांच्या मृत्यूला प्रदूषण जबाबदार आहे. त्यानुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे दररोज साडेसहा हजार लोकांचा मृत्यू होतो.