Sania Mirza : भारतासाठी टेनिसमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सानिया मिर्झाला पेन्शन का मिळत नाही?
भारताची प्रमुख टेनिसपटू असलेल्या सानिया मिर्झाने 2023 मध्ये निवृत्ती घेतली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरियरमध्ये सानियाने तीन ग्रँडस्लॅम महिला डबल किताब जिंकले आहेत.
2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बलडन आणि आणि 2015 यूएस ओपनमध्ये तिने पराक्रम करुन दाखवला होता.
सानियाची एकूण संपत्ती 200 कोटींच्या आसपास आहे.
भारतात टेनिस हे ऑल इंडिया टेनिस असोशिएशन म्हणजेच AITA द्वारे संचलित केले जाते. AITA कडे खेळाडूंसाठी कोणतीही पेन्शन योजना नाही.
त्यामुळे सानिया मिर्झा निवृत्ती घेतल्यानंतर एक रुपयाचा देखील पेन्शन मिळत नाही.
दरम्यान, निवृत्ती घेतल्यानंतर सानियाने हैद्राबादमध्ये तिची एक टेनिस अकादमी सुरु केली आहे.
दरम्यान, पेन्शन मिळत नसली तरी सानिया जाहिरातींच्या माध्यमांतून कोट्यावधी रुपये कमावते.
याशिवाय तिचं करियर सुरु असताना तिने मोठी गुंतवणूक देखील केलेली आहे.
सानिया फिट राहण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहिली आहे, तिची ही आवड देखील बनली. यातूनच तिने स्वत:चे प्रॉडक्टस आणि ब्रँड देखील लाँच केले होते. यातून देखील तिची मोठी कमाई होते.