In Pics : महाराष्ट्राचा सुपुत्र रुद्राक्ष पाटील चमकला, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारतीय संघात निवड
महाराष्ट्राचा सुपुत्र रुद्राक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने ऑलिम्पियन ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर हिला 16-6 च्या फरकाने मात देत एमपी स्टेट नेमबाजी अकादमी श्रेणीतील 10 मीटर एअर रायफल T6 राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी जिंकली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुद्राक्ष आणि ऐश्वर्या यांनी आठ जणांच्या उपांत्य फेरीत अनुक्रमे 261.9 आणि 261.3 गुणांसह पहिले आणि दुसरे स्थान पटकावले.
त्यापूर्वी, 392-मजबूत पात्रता झोनमध्ये, रुद्राक्षने 630.2 गुण मिळवून एअर आर्मीच्या रवी कुमारच्या मागोमाग दुसरे स्थान पटकावले. रवीने 630.7 गुणांनी फेरी जिंकली तर ऐश्वर्या यावेळी 629.4 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.
रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा धाकटा मुलगा आहे.
त्याने याआधी देखील 10 मीटर रायफल शूटिंग या प्रकारात चांगली कामगिरी केली आहे.
त्याने काही महिन्यांपूर्वी जर्मनीमधील सेहूल येथे झालेल्या आयएएसएस कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी पार पडली होती.
या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रुद्राक्षने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक होते. भारताने त्याआधी स्पर्धेत 8 सुवर्णपदके जिंकली होती. अंतिम टप्प्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून नंतर झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत ही आपली छाप रुद्राक्ष याने यावेळी सोडली.
देशात एकीकडे सर्वांना क्रिकेटनं वेड लावलं असताना रुद्राक्षने वेगळ्या वाटेने जात रायफल शूटींगमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
या सर्वामध्ये रुद्राक्षच्या परिवाराने त्याला खूप सपोर्ट केला.
रुद्राक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे पालघर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार आहे. तर आई हेमांगिनी पाटील या परिवहन विभागात नवी मुंबई वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.