Nagpur Ganesh Visarjan : उपराजधानीत गणेश विसर्जनाची धूम, कृत्रिम तलावात विसर्जनाच्या हाकेला, नागपूरकरांची साथ
मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. नेक्सा शोरुममध्ये विराजमान गणपतीचे विसर्जन फुटाळा येथील कृत्रिम टँकमध्ये करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री कृष्ण गणेश मंडळ, सिव्हील लाईन येथील भाविकांनाही बाप्पाला निरोप देण्यापूर्वी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
पुढच्या वर्षी लवकर...अशी प्रार्थना करत चिमुकल्यांनीही गणरायाला निरोप दिले.
साश्रू नयनांनी भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
भाविकांनी स्वतः विसर्जनस्थळी असलेल्या स्वयंसेवकांना आपले निर्माल्य देऊन नंतरच टँकमध्ये मूर्ती विसर्जन केले.
गणरायाच्या आरतीनंतर भाविकांना प्रसाद वाटताना चिमुकले.
प्रत्येक विसर्जन टँकसमोर दोन स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धथीने निर्माल्य गोळा करत होते.
अंबाझरी तलावाजवळही लावण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन टॅंकमध्ये परिसरातील भाविकांनी गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले.
आरतीनंतर संपूर्ण विधीद्वारे गणरायाचे निरोप भाविकांनी घेतले.
अबाल-वृद्धांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जनस्थळ गाठले.