Health Tips : शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
शेंगदाण्यात मॅंगनीज (Manganese) आणि कॅल्शियम (Calcium) दोन्ही आढळतात. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्याने एका घटकामुळे शरीराला दोन प्रकारचे फायदे होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमॅंगनीज हाडांमध्ये कॅल्शियम (Calcium) शोषण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास मदत करते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.
त्याचप्रमाणे शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.
शेंगदाण्याचा विशेष गुणधर्म म्हणजे ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
यामध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे हृदयाशी (Heart Disease) संबंधित आजारांपासूनही सुटका मिळते.
शेंगदाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते. तर, जेवणानंतर दररोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास ते अन्न पचण्यास मदत करते.
शेंगदाणे खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.