पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाने जगाचं वेधलं लक्ष; मनू भाकर-श्रीजेश भारताचे ध्वजवाहक, पाहा Photo
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. (Paris Olympics)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली.(Paris Olympics)
पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा फ्रान्समधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर झाला. हे फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे.(Paris Olympics)
या सोहळ्यासाठी स्टेडियमचे थिएटरमध्ये रूपांतर करण्यात आले. स्टेडियमचा नजारा पाहण्यासारखा होता.(Paris Olympics)
या सोहळ्यात अनेक कलाकारांनी सर्वांचे मनोरंजन केले. या समारोप सोहळ्यात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ देखील उपस्थित होता.(Paris Olympics)
या सोहळ्यात एक परेडही झाली, ज्यामध्ये सर्व खेळाडू आपापल्या देशांचे झेंडे घेऊन दिसले.(Paris Olympics)
भारताकडून हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर ध्वजवाहक म्हणून दिसले.(Paris Olympics)
समारोप समारंभात स्टेडियममध्ये लेझर शो झाला. या लेझर शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.(Paris Olympics)