Paris Olympic 2024: तीन वेळा अपयश, अखेर कर्णधार हरमनप्रीतची तिरकी चाल अन् भारतानं अर्जेंटिनाचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं
IND vs ARG Hockey Match :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील मॅच 1-1 अशा बरोबरीत सुटली. मॅचच्या सुरुवातीपासून भारतीय संघ एक गोलनं पिछाडीवर होता. मॅचच्या 58 व्या मिनिटापर्यंत भारत पिछाडीवर होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचा कॅप्टन हरमनप्रीत याच्या आक्रमक खेळामुळं आणि रणनीतीमुळं भारतानं अखेरच्या दोन मिनिटात बरोबरी साधली. पहिल्यांदा चौथ्या क्वार्टरमधील पाच मिनिट राहिली असताना गोलकीपर पी. आर श्रीजेशला बाहेर पाठवण्यात आलं.
अर्जेंटिनानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला. अर्जेंटिनाच्या लुकस मार्टिनेजनं गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं बरोबरी साधण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र, यश मिळालं नाही.
भारताला 58 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या चुकांमुळं पेनल्टी कॉर्नर मिळाला. कॅप्टन हरमनप्रीतनं गोल करण्याचे प्रयत्न केले. यानंतर भारताला पुन्हा सलग तीन वेळा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पहिले तीन प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर हरमनप्रीतनं रणनीती बदलली.
हरमनप्रीतनं गोल कीपरच्या उजव्या बाजूनं गोल करत भारताला मॅचमध्ये बरोबरी करुन दिली. 58 व्या मिनिटापर्यंत पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारताला कॅप्टनच्या गोलनं बरोबरी करता आली. आता मंगळवारी भारत आणि आयरलँड यांच्यात मॅच होईल.