Manu Bhaker : मनू भाकरला पुन्हा एकदा लग्नाबाबत प्रश्न, लाजली, हसली अन् उत्तर देत म्हणाली, माझं स्वप्न देशासाठी...
Manu Bhaker : मनू भाकरनं नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं मिळवून दिली आहेत. मनू भाकरचा या यशाबद्दल देशभरात सत्कार केला जात आहे.

मनू भाकर
1/5
मनू भाकरनं भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं मिळवून दिली आहेत. 10 मीटर एअर पिस्टल आणि मिश्र दुहेरीमध्ये तिनं कांस्य पदक मिळवलं.
2/5
स्वतंत्र भारताच्या इतिहासात एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती एकमेव खेळाडू ठरली आहे.
3/5
मनू भाकरचं 25 मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारातील कांस्य पदक थोडक्यात हुकलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक सुरु असतानाच नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या लग्नाबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यात काही तथ्य नसल्याचं समोर आलं होतं.
4/5
मनू भाकरला यापूर्वी देखील लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी तिनं स्पष्टपणे उत्तर दिलं होतं.
5/5
मनू भाकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात तिला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ती पहिल्यांदा लाजली नंतर हसली आणि भूमिका मांडली. सध्या काही विचार केला नाही. देव काय करतो हे आगामी वर्षांमध्ये पाहावं लागेल. सध्या माझं ध्येय देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचं ध्येय असल्याचं मनू भाकरनं म्हटलं.
Published at : 25 Aug 2024 11:25 PM (IST)