IPL 2025 : हार्दिक पांड्याविरुद्ध रचला गेला कट? मुंबई इंडियन्सच्या गटात नेमकं चाललंय तरी काय? अखेर सत्य आलं समोर

आयपीएल 2025 हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खळबळजनक बातम्या येत आहेत. आयपीएल 2025 पूर्वी संघात अनेक मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये सर्वात मोठा बदल कर्णधारपदाच्या बाबतीत होऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यादरम्यान आणखी एक मोठी बातमी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, गेल्या हंगामात पांड्याविरुद्ध कट रचला गेला होता. त्याचा निगेटिव्ह पीआरकरून ट्रोल करण्यात आले होते. या चर्चत रोहित शर्माचेही नाव पुढे आले आहे.

खरंतर, स्पोर्ट्सयारीच्या एका व्हिडिओमध्ये हार्दिक आणि मुंबई इंडियन्सबद्दल दावा करण्यात आला आहे. त्यानुसार रोहितसह अनेक खेळाडूंना हार्दिक संघाचा कर्णधार म्हणून नको आहे. यासोबतच आणखी एक दावा करण्यात आला आहे.
आयपीएल 2024 मध्ये पांड्याला खूप ट्रोल करण्यात आले होते. तो एक कटाचा भाग होता. हार्दिक पांड्याविरुद्ध निगेटिव्ह पीआर करण्यात आला. निगेटिव्ह पीआर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खोटी बनवणे आणि पांड्यासोबत असेच झाले.
मुंबई इंडियन्समध्ये सचिन तेंडुलकरचा खूप प्रभाव आहे. तो आणि रोहित दोघांनाही पुढच्या हंगामात पांड्याकडे कर्णधारपद द्यायचे नाही. पांड्याविरुद्धच्या कटात रोहितचे नावही ओढले जात आहे. मात्र, यात किती तथ्य आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही या फक्त चर्चा आहेत.
रोहित आणि सचिनला सूर्यकुमार यादवला संघाचा नवा कर्णधार बनवायचा आहे. सूर्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधारही बनला आहे. रिपोर्टनुसार, सूर्याच्या जागी हार्दिक कर्णधार बनणार होता. मात्र हे करण्यात आले नाही. अनेक खेळाडूंनी पंड्याविरोधात मत व्यक्त केले आहे.