In Pics : नीरज चोप्राचा 'गोल्डन थ्रो', भालाफेकमध्ये देशासाठी जिंकलं पहिलं सुवर्ण पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. (photo courtesy @neeraj____chopra instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनीरजच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ तब्बल 13 वर्षानंतरचं संपुष्टात आला. (photo courtesy @neeraj____chopra instagram)
नीरजच्या या सुवर्ण कामगिरीमुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. नीरजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (photo courtesy @neeraj____chopra instagram)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांनी आणि सेलिब्रिटींकडून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. (photo courtesy @neeraj____chopra instagram)
नीरजच्या फायनल मॅचआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी बातचित केली होती. यामध्ये कोणतंही अपेक्षाचं ओझं न घेता खेळण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला दिला होता. (photo courtesy @neeraj____chopra instagram)
(photo courtesy @neeraj____chopra instagram)
ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत. (photo courtesy @neeraj____chopra instagram)