International Beer Day : आज आंतरराष्ट्रीय बिअर दिन... बिअरबद्दलच्या 'या' महत्वाच्या गोष्टी जाणून घ्याच...

International Beer Day : आज आंतरराष्ट्रीय बिअर दिन आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्टचा पहिला शुक्रवार हा आंतरराष्ट्रीय बिअर दिन (International Beer Day) म्हणून सेलिब्रेट केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बिअर पिण्याचे कैक फायदे आपल्याला मद्यप्रेमी सांगत असतात मात्र ते खरंच खरे असतात का? याबद्दल आपल्याला माहिती नसते. मात्र बिअर पिण्याचे खरोखर काही फायदे आहेत. मात्र फायद्यासोबत बिअर पिण्याचे तोटे देखील आहेत

बिअर पिणाऱ्या लोकांना प्रकार दोनच्या मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांपर्यंत कमी असतो. बिअरच्या सेवनाने हाडांना बळकटी मिळते पण प्रमाणाबाहेर बीअर सेवन केल्यास ती आरोग्यास अपायकारक आहे.
बिअरव्यतिरिक्त अन्य ड्रींक्स जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुतखड्याचा त्रास होऊ शकतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली ठेवण्यासाठी बिअर उपयुक्त आहे
पिंट बिअरच्या सेवनाने हृदयरोगाचा धोका 31 टक्क्यांपर्यंत कमी होतो. बिअरमध्ये व्हिटॅमिन बी6 आणि बी 12 मोठ्या प्रमाणावर असतात. यात असलेल्या सिलिकॉनमुळे हाडं मजबूत होतात.
बिअरमध्ये आरोग्यास उपयुक्त असे बरेच पोषक तत्व असतात. यात पँटोथॅनिक अॅसिड, नियासिन, फोलेट, रिबोफ्लावीनसारखे बरेच घटक शरीरास फायदेशीर असतात. चहा, कॉफीनंतर लोकांची सर्वाधिक पसंती असणारे पेय आहे. पण याचा वापर मर्यादित प्रमाणात केल्यास आरोग्यास अपाय होत नाही. बिअर एक मद्य असलं तरीही प्रमाणात घेतल्यास बिअर फायदेशीर असते.
बिअर अल्कोहोलीक आहे, पण तरीही जगभरातील अनेकजण त्याचे सेवन करतात. बिअरचे कमी प्रमाणात सेवन आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे अनेक रिसर्चमधून सांगितले जाते. मात्र, बिअरच्या सेवनाने मधूमेहाचा धोकाही संभवतो.अल्कोहोलमुळे शरिरातील ग्लूकोजचं प्रमाणही कमी होतं. ग्लूकोज कमी झाल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.