In Pics | मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारी पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बेस्ट बस नेमकी कशी आहे? पाहा फोटो
74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्यांचा आणि पुनर्विकसित माहिम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून 24 अत्याधुनिक एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करणार आहेत. अगदी सहा रुपयांपासून तिकीट असलेल्या इलेक्ट्रिक बसने विविध भागांमध्ये प्रवास करू शकणार आहेत
टप्प्याटप्प्याने पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत साधारणपणे अशा प्रकारच्या 1800 बस बेस्ट बसच्या ताब्यात देणार आहेत.
साधारणपणे सव्वा ते दीड कोटी रुपयांची एक इलेक्ट्रिक बसची किंमत आहे
मुंबईकरांना सामान्य बेस्ट प्रमाणेच तिकीट दर आकारले जातील अगदी सहा रुपयांपासून या इलेक्ट्रिक बसचे तिकीट असणार आहे.
बारा मीटर लांब आणि 35 आसनक्षमता असलेली ही बस आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी खास व्हिलचेअर लिफ्ट बेस्ट बसमध्ये आहे
बस एकदा चार्जिंग केल्यास दीडशे किलोमीटर पर्यंत प्रवास करता येऊ शकतो. अत्याधुनिक व्हेंटिलेशन सिस्टिम सोबतच मोबाईल चार्जिंग की सुविधा या बेस्ट बसमध्ये असणार आहे.
बसची बॅटरी वरच्या खालच्या बाजूला नसून वरच्या बाजूला असणार आहे जेणेकरून पावसाळ्यात बॅटरी खराब किंवा बंद पडणार नाही
पब्लिक अॅड्रेस सिस्टीम आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम बसमध्ये आहे, ज्याद्वारे चालक प्रवाशांना सूचना देऊ शकतो शिवाय प्रवाशांना सुद्धा येणाऱ्या स्टेशनची माहिती मिळू शकते.