Yogesh Kathuniya : डिस्कस थ्रोमध्ये योगेशची जबरदस्त कामगिरी, योगेशचा कमालीचा संघर्ष
Tokyo Paralympics : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. (photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयोगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं.(photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती. (photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
योगेशच्या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, योगेश कठुनिया यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.(photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
योगेशनं देशासाठी रौप्य पदक मिळवल्याचा आनंद आहे. त्याचे यश निश्चितच अनुकरण करण्यासारखे आहे आणि ते नवोदितांना प्रेरणादायी ठरेल. योगेशचं खूप अभिनंदन आणि भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. (photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
योगेशनं आतापर्यंत सहा मुख्य स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. बहादूरगडच्या राधा कॉलनीत राहणारा योगेश. 1997 मध्ये जन्मलेला योगेशचे हात आणि पाय 2006 मध्ये पॅरालाईज झाले. काही काळानंतर हात ठीक झाले. 2017 मध्ये दिल्ली विद्यापीठात शिकत असताना त्याचा मित्र सचिन यादवनं त्यांना खेळात भाग घ्यायला लावला. (photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
योगेशला डिस्कस थ्रो अर्थात थाळीफेमध्ये आपण काहीतरी करु शकतो असा विश्वास निर्माण झाला आणि त्यानं तयारी सुरु केली. त्याची आई मीना आणि वडील ज्ञानचंद यांनी त्याच्या प्रयत्नाना उभारी दिली आणि आज योगेशनं आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळवला. (photo courtesy : @yogeshkathuniya/IG)