PHOTO : हॉकी संघानं 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमधील पदकाचा दुष्काळ संपवला, गोलकिपर श्रीजेश विजयाचा मानकरी
भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला असून जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. (PHOTO : @ptigallery)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघानं अटी-तटीच्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 अशा फरकानं पराभव केला. (PHOTO : @ptigallery)
सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली होती. पण, भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. (PHOTO : @ptigallery)
भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नेटकरी पीआर श्रीजेशवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच अनेकांनी आजच्या सामन्यातील श्रीजेशच्या अभेद्य कामगिरीमुळं त्याला 'द ग्रेट वॉल' असं संबोधायला सुरुवात केली आहे. (PHOTO : @weareteamindia)
भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहनं प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. (PHOTO : @ptigallery)
यापूर्वी भारताच्या वासुदेवन भास्करनच्या नेतृत्त्वात 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. (PHOTO : @ptigallery)
(ptigallery)आजच्या पदाकासोबतच ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या 12 झाली आहे. यापैकी 8 सुवर्णपदकं, एक रौप्यपदक आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे. (PHOTO : @ptigallery)
(PHOTO : @ptigallery)
(PHOTO : @ptigallery)