Kamika Ekadashi : आज कामिका एकादशी... विठुराया अन् रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट, पाहा फोटो
प्रत्येक एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आषाढ कृष्ण अर्थात कामिका एकादशी निमित्त देखील मंदिराला आकर्षक अशी सजावट केली आहे.
बार्शी येथील विठ्ठल भक्त श्रीकांत शिवाजी गणपुले यांनी विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांच्या सजावटीची सेवा दिली आहे.
विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी , नामदेव महाद्वार या ठिकाणी अतिशय वैविध्यपूर्ण पद्धतीने ही फुल सजावट करण्यात आली आहे.
फुलांच्या मदतीने सजावट करताना लहान लहान धबधबे अतिशय कल्पकतेतून साकारण्यात आले आहेत.
या सजावटीसाठी झेंडू, मोगरा, कामिनी, ब्ल्यू डीजे, टटिस, शेवंती, गुलछडी, गुलाब अशा 15 प्रकारच्या फुलांचा व विविध रंगी पानांचा आकर्षक पद्धतीने वापर करण्यात आला आहे .
सध्या कोरोनामुळं मंदिर बंद असलं तरी सर्व नित्योपचार पार पाडले जात आहेत.