Hockey India: पोरींनी रचला इतिहास, समोर दिग्गज ऑस्ट्रेलिया, प्रत्येक सेकंदाला धाकधूक, पण शेवटी विजय मिळवलाच
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. (photo_source-@Tokyo2020hi)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.(Photo Source-@TheHockeyIndia)
भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली आहे.(Photo Source-@TheHockeyIndia)
ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं केला आहे.(Photo Source-@TheHockeyIndia)
टीम इंडियानं या सामन्यात गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर हा ऐतिहासिक विजय मिळवला.(Photo Source-@TheHockeyIndia)
दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला गुरजीतनं एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली (Photo Source-@TheHockeyIndia)
या सामन्यात भारताची गोलकिपर सवितानं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. सवितानं ऑस्ट्रेलियाचं मजबूत आक्रमण अनेकदा परतवून लावलं. विशेष म्हणजे पेनाल्टी क़ॉर्नरवर तिने केलेला बचाव हा वाखाणण्याजोगाच होता. तिच्या या कामगिरीमुळं सोशल मीडियावर तिचं चांगलंच कौतुक होत आहे.(Photo Source-@TheHockeyIndia)