In Pics : धबधबे, धुके आणि निसर्गाने पांघरला हिरवा शालू! भंडारदरा धरण परिसरात मनमोहक दृष्य
दाट धुक्यांनी वेढलेले रस्ते, उंच डोंगरावरून पडणारे धबधबे तर निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू हे मनमोहक दृश्य आहे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरातील. (सर्व फोटो- विलास तुपे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआषाढ सरींनी जोरदार हजेरी लावल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील 11 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भंडारदरा धरण 85 टक्के भरले असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागलाय. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या तीन महत्वाच्या धरणापैकी भंडारदरा असून पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉल वाहू लागला आहे.
भंडारदरा धरणाजवळील आंब्रेला फॉल सध्या सुरु ठेवण्यात आला असून छत्री सारख्या दिसणाऱ्या या फॉल जवळ ही पर्यटक गर्दी करत असून सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरत नाही.
भंडारदरा धरण परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम असून परिसरातील अनेक डोंगर माथ्यावरून पडणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागले आहे.
रंधा धबधबा, आम्रेला फॉल यासह संपूर्ण परिसर हिरवागार शालू सारखा नटला असल्यान पर्यटकांची संख्या वाढली आहे. रंधा धबधबा हा राज्यात प्रसिद्ध असून पूर्वी पावसाळ्यात असो वा नंतर हा धबधबा सुरु राहत असे. मात्र आता भंडारदरा धरणा खालोखाल निळवंडे धरण बांधण्यात आलंय. त्यामुळे या धरणाच्या पातळीत वाढ झाल्यानंतर रंधा धबधबा दिसत नसल्याने आता पर्यटक मोठ्या संख्येन या ठिकाणी गर्दी करतायेत.
रंधा फॉलपासून ते घाटघर रस्त्यावर पर्यटकांची गर्दी आता दिसत असून जिवंतपणी स्वर्गात आल्यासारखा अनुभव मिळत असलायची प्रतिक्रिया पर्यटकांनी दिलीय.