In Pics | भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भारताच्या पॅरालिम्पिक खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचा सन्मान केला. या दरम्यान, खेळाडूंनी त्यांना आपल्या स्वाक्षरीसह एक स्टोल भेट केली, जी मोदींनी त्यांच्या गळ्यात घातली होती. भारतीय पॅरा-अॅथलीट पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह 19 पदके जिंकून टोकियोहून परतले आहेत. ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. पदकतालिकेत भारत 24 व्या स्थानावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी बॅडमिंटन खेळाडू रौप्य पदक विजेते नोएडा जिल्हाधिकारी सुहास यथिराज, सुवर्णपदक विजेता कृष्णा नागर आणि युवा पलक कोहली यांच्याशी बातचित करताना दिसले. पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच समाविष्ट झालेल्या बॅडमिंटनमध्ये भारतीयांनी दोन सुवर्णांसह चार पदके जिंकली. अवनी लेखरा आणि सिंहराज अडाना हे नेमबाजही पंतप्रधानांशी बोलताना दिसले. दोघांनी दोन दोन पदके जिंकली आहेत.
बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकणारे नोएडाचे डीएम सुहास यथिराज यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. अवनी लेखराने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. तसेच लहानपणी पोलिओची शिकार झालेल्या 39 वर्षीय सिंहराज अडानाने रौप्य आणि कांस्य जिंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भालाफेकपटू देवेंद्र झाझडिया आणि अॅथलीट मरिअप्पन थंगावेलू यांच्याशीही चर्चा केली. दोघांनी रौप्य पदके जिंकली. टेबल टेनिसपटू भाविना पटेल आणि तिरंदाज हरविंदर सिंग देखील फोटोंमध्ये दिसत आहेत. भाविना पटेलने रौप्य आणि हरविंदर सिंगने कांस्य पदक जिंकले आहे.
पंतप्रधानांनी विशेषत्वाने या दलाचे दुर्दम्य धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रथम कौतुक केले आणि म्हणाले की, पॅरा-क्रीडापटूंनी त्यांच्या जीवनात ज्या अगम्य अडचणींवर मात केली आहे, त्यांच्या तुलनेत ही कामगिरी कौतुकास्पद आहे. जे अंतिम यश साध्य करू शकले नाहीत, अशांचे मनोबल वाढविताना, पंतप्रधान म्हणाले की, खरा क्रीडापटू हा कधीच पराभव किंवा विजय यामध्ये अडकून रहात नाही आणि तो कायम पुढे जात राहतो.
पंतप्रधनांनी सर्व पॅरा–क्रीडापटूंना आमंत्रित केल्याबद्दल खेळाडूंनी त्यांचे आभार मानले आणि त्या सर्वांशी एकाच टेबलवर बसून संवाद साधला, हेच त्यांचे सर्वात मोठे यश आहे, अशी भावना व्यक्त केली.
अनेक खेळाडूंनी त्यांची स्वाक्षरी केलेले क्रीडा साहित्य, आपली जिंकलेली पदके पंतप्रधानांना दिली. सर्व पदक विजेत्यांची स्वाक्षरी असलेले एक उपरणे देखील पंतप्रधानांना भेट देण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की स्वाक्षरी केलेल्या या क्रीडा साहित्याचा लिलाव केला जाणार आहे आणि क्रीडापटूंनी याचे स्वागतही केले. केंद्रीय क्रीडा मंत्री आणि केंद्रीय कायदा मंत्री देखील या समारंभास उपस्थित होते.