In Pics हसवण्यात पुढे असलेले The Kapil Sharma Show मधील कलाकर शिक्षणातही मागे नाहीत
'द कपिल शर्मा शो'मध्ये, कपिल शर्मा आणि त्यांची टीम दर आठवड्याच्या शेवटी नवीन एपिसोड्सह आपल्याला हसवण्यासाठी तयार असतात. हे सर्व अभिनेते उत्कृष्ट विनोदी कलाकार आहेत पण तुम्हाला माहित आहे का की या कलाकारांचं शिक्षण काय आहे. जाणून घेऊया या शोचे कलाकार किती सुशिक्षित आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंदन प्रभाकर: चंदन प्रभाकरने श्री राम आश्रम सिनियर सेकंडरी विद्यालय, अमृतसर येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याने हिंदू कॉलेज अमृतसरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चंदन प्रभाकर लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता.
भारती सिंह: भारतीने तिचे शालेय शिक्षण अमृतसरच्या एका सरकारी शाळेत पूर्ण केले आणि नंतर ती बीबीके डीएव्ही कॉलेज फॉर वुमनमध्ये शिकण्यासाठी पंजाबला गेली. तेथे तिने बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये पदवी पूर्ण केली. पुढे तिने आय के गुजराल पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
किकू शारदा: मुंबईतील डॉन बॉस्को हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर किकूने नरसी मोंजी महाविद्यालयातून कॉमर्स आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. किकूने मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई येथून एमबीए केले आहे.
कपिल शर्मा: कॉमेडियन आणि द कपिल शर्मा शोचा होस्ट कपिल शर्माने बॅचलर ऑफ आर्ट्स आणि कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. कपिल शर्माने अमृतसरच्या हिंदू कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्माने जालंधरच्या एपीजे कॉलेजमधून कमर्शियल आर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे.
सुमोना चक्रवर्ती: सुमोनाने शालेय शिक्षण कॉन्व्हेंट स्कूल, लखनऊ येथे पूर्ण केले. सुमोनाने जय हिंद कॉलेज मुंबईतून अर्थशास्त्रातून पदवी पूर्ण केली.