भारताची निशा दहिया हात तुटल्यानंतरही लढली; हरल्यानंतर ढसाढसा रडली, पॅरिस ऑलिम्पिकमधील भयानक दृश्य
भारताची महिला मल्ल निशा दहिया हिला दुखापतीमुळे ऑलिम्पिक पदकास मुकावे लागले. (Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर मोक्याच्यावेळी हात दुखावल्याने निशाला उत्तर कोरियाच्या पाक सोल गमविरुद्ध 8-2 अशा भक्कम आघाडीनंतर पराभव पत्करावा लागला. (Social Media)
68 किलो वजनी फ्रीस्टाईल गटात निशाने आधी यूक्रेनच्या तेतिआना सोवा रिझको हिचा 6-4 असा पराभव केला. यानंतर तिने गमविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत 8-2 अशी जबरदस्त आघाडी घेतली. (Social Media)
अखेरच्या 33 सेकंदांमध्ये झालेल्या हाताच्या दुखापतीमुळे निशाच्या हालचालींवर मर्यादा आल्या. (Social Media)
असह्य वेदनेसह खेळणाऱ्या निशाच्या या दुखापतीचा फायदा घेत गमने सलग 8 गुण घेत 10-8 अशी बाजी मारली.(Social Media)
डॉक्टरांना तपासणीसाठी सामन्यात एकदा, दोनदा नाही तर तीनदा मॅटवर यावे लागले. (Social Media)
हात तुटला असूनही निशा हार मानायला तयार नव्हती आणि वेदना होत असतानाही कुस्ती सुरूच ठेवली. (Social Media)
निशा दहियाच्या दुखापतीमुळे उत्तर कोरियाचा कुस्तीपटू सोल गमसाठी विजय सोपा झाला. (Social Media)
निशाने उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूविरुद्ध दमदार सुरुवात केली होती आणि सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती, पण दुखापतीमुळे भारताचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील चौथे पदक हिरावले आहे.(Social Media)
पराभवानंतर निशाला अश्रु अनावर झाले. मात्र तिच्या हिंमतीचे जगभरातून कौतुक होत आहे. (Social Media)