PHOTO: 'गोल्डन' बॉयनं 'डायमंड' लीग जिंकली; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं.
नीरजनं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) रौप्यपदक जिंकलं होतं. त्यावेळी त्याला कंबरेला दुखापत झाली होती.
नीरजनं ही स्पर्धा जिंकत आणखी एक मार्ग खुला केला आहे.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला.
यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेकला. त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही.
त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही.
पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.