Kabaddi : कब्बडीच्या उपांत्य सामन्यात हरयाणाकडून महाराष्ट्र पराभूत, कस्यपदकावर समाधान

महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून 29-39 असा पराभव पत्करल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कॅम्पाबेल मल्टपर्पज क्रीडा संकुल येथे झालेल्या सामन्यात आक्रमक सुरुवात करीत हरयाणाने 12 व्या मिनिटाला महाराष्ट्रावर पहिला लोन देत 18-11 अशी आघाडी घेतली.

मध्यंतराला 20-16 अशी नाममात्र आघाडी हरयाणाकडे होती. उत्तरार्धात आणखी एक लोण देत ती 33-22 अशी वाढवली.
महाराष्ट्राला हरयाणावर लोण देण्याची संधी आली होती. मैदानावर शिलकी तीन खेळाडू होते आणि अजय नरवालची तिसरी चढाई होती.
या चढाईत त्याने अरकमला टिपले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूची पकड झाली. त्यामुळे तो होणारा लोन हरयाणाने वाचवला.
महाराष्ट्राच्या शंकर गदई आणि किरण मगर यांनी एक-एक अशा दोन अव्वल पकडी केल्या. पण त्याचे रुपांतर विजयात करता आले नाही.
महाराष्ट्राकडून अस्लम शेख, आदित्य शिंदे, आकाश शिंदे, किरण मगर, शंकर गदई यांनी संघाचा पराभव टाळण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. त्यात ते अपयशी
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेनादलाने चंदीगड 49-25 असे नमवत अंतिम फेरीत धडक दिली. सेनादलविरुद्ध हरयाणा अशी पुरुषांत, तर हिमाचल प्रदेश विरुद्ध हरयाणा अशी महिलांत अंतिम लढत होईल.
महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये यंदा एकच कांस्यपदक मिळवता आले. महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान सोमवारी साखळीतच संपुष्टात आले. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन्ही गटांत रौप्यपदके पटकावली होती.