In Pics : महाराष्ट्र खो-खो पुरुषांसह महिला संघांची कमाल, 55 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजयी कामगिरी

उस्मानाबाद येथे 55 वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धा सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं.

स्पर्धेच महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे.
नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे.
भारतीय खोखो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात 24 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे.
पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर 17-7 असा दमदार विजय मिळवला.
महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राने अरुणाचल प्रदेशचा 18-3 असा एक डाव 15 गुणांनी एकतर्फी विजय मिळवला.
महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा बलचा 18-4 असा एक डाव 14 गुणांनी धुवा उडवला.
तसंच पुरुषांच्या एका सामन्यात विदर्भाने दुबळ्या जम्मू-काश्मीरचा 23-8 असा एकतर्फी विजय मिळवला.